Jawahar Chana 24 : यंदा शेतकऱ्यांना हरभराऱ्याची काढणी करणं सोपं होणार आहे. कारण, जवाहरलाल नेहरु कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हरभऱ्याची एक विशेष जात विकसित केली आहे. 'जवाहर चना 24' असे या हरभऱ्याच्या नवीन जातीचं नाव आहे. या जातीच्या हरभऱ्याची हार्वेस्टरनं काढणी शक्य होणार आहे. त्यामुळं त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
हरभरा काढणी लगेच होणार
जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हरभऱ्याची एक विशेष जात विकसित केली आहे. जवाहर चना 24 असे हरभऱ्याच्या नवीन जातीचं नाव आहे. जी पोषणाच्या दृष्टीनं अधिक फायदेशीर ठरेल.
तसेच, ते शेतकऱ्यांसाठी मोठ्या उत्पन्नाचं साधन बनणार आहे. या नवीन जातीच्या हरभऱ्याची काढणी हार्वेस्टरनं शक्य होणार आहे. त्यामुळं जिथे हरभरा काढणीला अनेक दिवस लागायचे, तिथे आता काढणी लगेच होणार आहे.
भाकरी महागली! ज्वारीच्या दरात मोठी वाढ
साधारणत: हरभऱ्याची लांबी 45 ते 50 सेमीपर्यंतच असते. परंतू, जवाहरलाल नेहरु कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी जवाहर चना 24 या हरभऱ्याची विशेष जात विकसित केली आहे. ज्याची कापणी हार्वेस्टरने करता येते. या नवीन हरभऱ्याच्या झाडाची ऊंची 65 सेमी होते. त्यामुळं यंत्राच्या सहाय्यानं काढणी शक्य होते.
ऊसाच्या मापात पाप करणाऱ्या साखर कारखान्यांना बाबत आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय; आता...
महाराष्ट्रात लागवड करता येणार
या जातीचे धान्य सामान्य जातींपेक्षा मोठे, आकर्षक आणि तपकिरी रंगाचे असते. याच्या रोपाची देठ देखील जाड, मजबूत आणि जोरदार वारा सहनशील आहे. ही जात 110 ते 115 दिवसांत तयार होते. महाराष्ट्रात ही याची लागवड करता येणार आहे.
हरभरा हे एक प्रमुख कडधान्य पीक आहे. या पिकाची लागवड रब्बी हंगामात केली जाते. उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि बिहारमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान हरभऱ्याची पेरणी केली जाते. यातून हरभऱ्याचे बंपर उत्पादन मिळते.
Raju Shetti : "शेतकऱ्यांना लुटून हाच पैसा राजकारणात वापरला जातो"
Share your comments