1. कृषीपीडिया

‘शेत तिथे पौष्टिक तृणधान्य’ मोहीम; कृषी संचालक विकास पाटील यांची माहिती

पुणे : ‘शेत तिथे पौष्टिक तृणधान्य’ अशी मोहीम खरीप हंगामात राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतल्याची माहिती कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी दिली.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
‘शेत तिथे पौष्टिक तृणधान्य’ मोहीम; कृषी संचालक विकास पाटील यांची माहिती

‘शेत तिथे पौष्टिक तृणधान्य’ मोहीम; कृषी संचालक विकास पाटील यांची माहिती

पुणे : ‘शेत तिथे पौष्टिक तृणधान्य’ अशी मोहीम खरीप हंगामात राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतल्याची माहिती कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी दिली. सन 2023 हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्यात येणार आहे. याद्वारे पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्त्व, पोषण मूल्य, दुष्काळात तग धरणारी पिके या दृष्टीनेदेखील महत्त्व आहे. काळाच्या ओघात पिकांची उत्पादकता कमी आल्याने व इतर गळीत धान्य, नगदी पिकांवर भर दिल्यामुळे पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे.

या पिकांचे महत्त्व लक्षात घेता त्यांना चालना देण्याच्या सूचना सर्व जिल्हा कृषी अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेंतर्गत गावातील प्रत्येक शेतकर्‍याला त्याच्या भागातील वाढीस अनुकूल असलेल्या पौष्टिक तृणधान्यांचे पीक निवडून त्यांचे मिनी किट स्वरूपात वाटपाबाबत सलग, आंतरपीक, मिश्रपीक, बांधावर पेरणी पध्दतीने त्यांची लागवड करण्यास उद्युक्त करण्यात यावे. ज्यात कोरडवाहू भागात बाजरी व ज्वारी, पश्चिम घाट प्रदेशात नाचणी, वरई व राळा आदींचा समावेश आहे.

सन 2023 हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्यात येणार आहे. याद्वारे पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्त्व, पोषण मूल्य, दुष्काळात तग धरणारी पिके या दृष्टीनेदेखील महत्त्व आहे. काळाच्या ओघात पिकांची उत्पादकता कमी आल्याने व इतर गळीत धान्य, नगदी पिकांवर भर दिल्यामुळे पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे.या पिकांचे महत्त्व लक्षात घेता त्यांना चालना देण्याच्या सूचना सर्व जिल्हा कृषी अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. 

शेतकर्‍यांना बियाण्यांचे मिनी किट मोफत : प्रत्येक शेतकर्‍याला बियाण्यांचे पन्नास ते शंभर ग्रॅम वजनाचे मिनी किट तयार करून मोफत देण्यात यावे. यासाठी बियाण्यांची उपलब्धता महाबीज,राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून घेण्यात यावी. त्यांच्याकडून बियाणे उपलब्ध न झाल्यास शेतकरी उत्पादक कंपन्या व स्थानिकरीत्या बियाणे उपलब्ध करून त्यांना मिनी किट देण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत वाटप केलेल्या मिनी किटची लागवड शेतकरी करतील, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचनाही क्षेत्रीय स्तरावर देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

English Summary: ‘Farm There Nutritious Cereals’ Campaign; Information of Agriculture Director Vikas Patil Published on: 21 June 2022, 04:20 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters