1. कृषीपीडिया

यावर्षी शेतीचे उत्पादन वाढवायचे आहे ना मग माती हे कराच

आपन शेतकरी वर्ग दरवर्षी नवनवीन पिकांची लागवड करत असतो.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
यावर्षी शेतीचे उत्पादन वाढवायचे आहे ना मग माती हे कराच

यावर्षी शेतीचे उत्पादन वाढवायचे आहे ना मग माती हे कराच

मात्र आपन माती मधल्या असलेल्या मुलद्रव्याची व‌ जमिनीच्या सुपिकतेची आपल्याला माहिती नसल्यामुळे जसे पाहीजेत तसे उत्पादन होत नाही.त्यामुळे काय होतं कि आपन पिकाच्या बाबतीत स्पर्धा चालू होते ति म्हणजे अनेक घातक रसायने व रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात शेती मधे वापर ! तरी त्या मधे पण त्याचे उत्पादन वाढतच नाही.या मागे काय कारण असु शकते हे पाहणे महत्त्वाचे आहे.मग ते असे होते की दुखणे असते हाताचे इलाज होतो पाया चां बरोबर ना !इलाज म्हणजे माती परीक्षण या मुळे होते असे की माती परीक्षणातून उत्पादन वाढीची समस्या सुटण्यास मदत होऊ शकते. बहुतेक शेतकरी याबाबत अनभिज्ञ असतात.आपल्याला जर मातीबद्दल माहिती घ्यायची असली तर आपन कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती येथे जाऊन किंवा आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्र यांच्या कडून माती परिक्षण करता येते.

यातून आपणास जमिनीची सुपिकता कळणार असून त्यानुसारच पिकाची लागवड करणे सोपे होईल.आता सध्या खरिप हंगामाची लगबग सुरू झाली असेल. पेरणीसाठी शेतकरी बियाण्यांची जुळवाजुळव करीत आहे.मागच्या वर्षी बियाण्याचा तुटवडा होता व सोयाबीन जसे पाहिजे तसे पिकलेच नाही त्याच बरोबर कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव व मावा-तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी कोणत्या पिकाची व वाणाची लागवड करावी याबाबत शेतकरी खुप विचार करीत आहे. आपन पिकाची लागवड करतांना आपल्या जमिनीच्या सुुपिकतेची तपासणी केल्यास आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होउ शकतो.आपन जमिनीचे परीक्षण न करता वेगवेगळ्या प्रकाराची खते आणि कीटकनाशकांची फवारणी करतो नेमके तेच कारण आहे जमिनीचा पोत बिघडण्याचे. एकाएकी उत्पन्नात घट येते. म्हणून माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपल्या साठी मातीची तपासणी करा.

आपल्या तालुक्यातील कृषी विभागाने ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. आता शेतकऱ्यांनी जागृत होऊन खरिप हंगामापूर्वी माती परीक्षण करण्याची गरज आहे.व त्याच बरोबर ई पिकं करणे आपल्या साठी महत्त्वाचे आहे.दुसरे म्हणजे मातीची नोंदणी करावी.नेमके आता सर्व बाजूने सारख्या जाडीची माती वरपासून खालपर्यंत तासून ती स्वच्छ घमेल्यात गोळा करून गोणपाटावर ठेवावी. प्रत्येक खुणेजवळ खड्डे घेऊन एका शेतातून गोळा केलेली माती एकत्र मिसळावी. तिचे सारखे चार भाग करावेत.समोरासमोरचे दोन भाग वगळून उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून, त्याचे चार भाग करावेत. त्यानंतर पुन्हा समोरासमोरचे दोन भाग वगळावेत. अशा तऱ्हेने शेवटी दोन ओंजळी किंवा अर्धा किलोग्रॅम माती शिल्लक राहिली पाहिजे. हीच क्रिया करावी. आपन घेतलेल्या मातीच्या नमुन्यासोबत शेतकऱ्याचे नाव, गाव, जिल्हा, सर्व्हे गट नंबर आणि

पुढील हंगामात घ्यावयाचे पीक याबाबत सविस्तर माहिती लिहून आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्र यांच्या येथे द्यावे मातीच्या संबंधित आपल्या तालुक्यातील माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावी.माती नमुना घेण्याची अशी आहे पद्धतनमुना काढण्यासाठी प्रथम शेतीची पाहणी करावी.जमिनीच्या प्रकारानुसार शेताचे विभाग पाडावेत.त्यानंतर जमिनीचा रंग, खोली, पोत, उंच व सखलपणा, पाणथळ किंवा ओलसर जागा आदी बाबींचा विचार करून प्रत्येक विभागातून स्वतंत्र प्रातिनिधिक नमूना घ्यावा.एका हेक्टरमधून १५ते २० ठिकाणची माती घ्यावी.नमूना घेण्यासाठी प्रत्येक विभागात नागमोडी रेषा काढून प्रत्येक वळणावर खड्डा घ्यावा. निवडलेल्या प्रत्येक ठिकाणाच्या जागेवरील काडीकचरा, दगड इत्यादी बाजूला करावेत. 

प्रत्येक ठिकाणी V व्ही आकाराचा खोलीचा खड्डा घेऊन त्यातील माती बाहेर काढून खड्डा मोकळा करावा.ओलसर जमिनीचे नमुने टाळावे मातीचा नमुना घेण्यासाठी विविध अवजारांचा वापर केला जाऊ शकतो. उदा. फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत. मातीचा नमूना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वीच घ्यावा. पिकास रासायनिक खत दिले असल्यास तीन महिन्यांच्या आत सदर जमिनीतून मातीचा नमूना घेऊ नये. निरनिराळ्या प्रकारची जमीन किंवा शेतातील मातीचे नमूने एकत्र मिसळू नयेत. माती नमूना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापरू नये. आज शेतामधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाड, विहिर पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमूने घेऊ नयेत हि दक्षता घेणे महत्त्वाचे आहे...बाका सर्व तुम्हाला माहिती आहेच.

 

मिलिंद जि गोदे

युवा शेतकरी

9423361185

milindgode111@gmail.com

Mission agriculture soil information

English Summary: Do you want to increase agricultural production this year or do you want soil? Published on: 29 May 2022, 09:23 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters