1. कृषीपीडिया

असे करा हुमणीचे एकात्मिक कीड व्यवस्थापण

हुमणी ही महाराष्ट्रासह देशभरातील पिकावर उपजीविका करणारी विध्वंसक कीड आहे.हुमणीची अळी अवस्था सर्वात धोकादायक असते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
असे करा हुमणीचे एकात्मिक कीड व्यवस्थापण

असे करा हुमणीचे एकात्मिक कीड व्यवस्थापण

हुमणी ही महाराष्ट्रासह देशभरातील पिकावर उपजीविका करणारी विध्वंसक कीड आहे.हुमणीची अळी अवस्था सर्वात धोकादायक असते.

शास्त्रीय नाव

माळ भागात आढळणाऱ्या मुख्य प्रजाती 

१) Holotrichia consanguinea

२)Holotrichia serrata

नदीकाठच्या भागात आढळणारी मुख्य प्रजात:- 

१)laucopholis lepidophora 

वरील प्रजाती महाराष्ट्रासह देशभरात आढळतात.

प्रादुर्भावित पिके:-

ऊस,भुईमूग, मिरची,पेरू,नारळ,तंबाखू, बटाटा,सुपारी,इ.तेलबिया, डाळवर्गीय आणि भाजीपाला पिके.

जीवनचक्र:-

ही कीड इतर कीटकांप्रमाणे अंडी,अळी,कोष आणि भुंगा अश्या चार अवस्थेतुन आपले जीवनचक्र पूर्ण करते. या कीटकाचे जीवन 10 ते 12 महिन्यांत पूर्ण होते.म्हणजेच एका वर्षी हुमणीची एकच पिढी जन्माला येते.

अंडी:-मादी भुंगे मिलनानंतर अंडी घालतात. लवकर सकाळच्यावेळी अंडी दिली जातात. दुधी पांढऱ्या रंगाची अंडी असतात.

अळी(हुमणी):-8 ते 10 दिवसात अंड्यातुन दुधी पांढऱ्या रंगाची हुमणी बाहेर पडते.इंग्रजी "C" आकारात हुमणी असते.हुमणी आपल्या चार अवस्थेतुन मोठी होते.त्यातील शेवटच्या तीन अवस्था पिकास हानिकारक ठरतात. पिकाची कोवळी मुळे कुरतडून पुढे सरकते. एक हुमणी कमीतकमी 1 मीटर आवारातील मुळांचा फडशा पाडते.

कोष:-संपुर्ण वाढ झालेली हुमणी जमिनीत कोषावस्थेत जाते.कोष राखडी तपकिरी रंगाचा असतो. H.consanguinea व H.serrata या दोन्ही प्रजाती 10 ते 16 दिवसांसाठी कोषावस्थेत असतात. त्यानंतर कोशामधून भुंगा बाहेर पडतो.

भुंगा:- H.consanguinea व H.serrata या दोन्ही प्रजातींचा भुंगा सारखाच दिसतो.कोषातून बाहेर आल्यानंतर भुंगे लगेच जमिनीतुन बाहेर येत नाहीत. उन्हाळ्यातील वळीव पाऊस झाल्यानंतर ते बाहेर पडतात. पण गेल्या काही वर्षांपासून भुंग्याची संख्या खूपच वाढल्यामुळे तसेच पाऊस काळ बदलल्याने ते वर्षाच्या कोणत्याही महिन्यात बाहेर पडत आहेत. हे भुंगें शेवगा,वड,बाभूळ,कडुलिंब, जांभुळ, चिकू,केळी,आंबा व बांधावर उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही झाडांच्या झाडपाल्यावर उपजीविका करू शकतात. संध्याकाळच्या वेळी ते पाने खाण्यासाठी व मिलनासाठी बाहेर पडतात.

संध्याकाळी पाने खाऊन पहाटेपर्यंत मादीसोबत मिलन करतात.त्यानंतर नर भुंगा लगेच मरून जातो. मादी भुंगा जमिनीत अंडी घालण्यासाठी जातो.

नुकसानीचे प्रकार:-

मादी भुंग्याने जमिनीत अंडी दिल्यानंतर त्यातून ७ते१० दिवसात हुमणी बाहेर पडते. सुरवातीस सेंद्रिय पदार्थावर जगते. त्यानंतर पिकांच्या कोवळ्या मुळास कुरतडून टाकते,परिणामी झाड वाळून मरून जाते.एक हुमणी कमीतकमी 1 मीटर आवारातील मुळांचा फडशा पाडते. एका वेळी मादी भुंगा ६०-७० अंडी देऊ शकतो व इतकी अंडी पूर्ण पीक नष्ट करण्यासाठी सक्षम असतात.असे भुंगे भागानुसार होणाऱ्या पहिल्या वळीव पावसानंतर सक्रिय होतात. त्यामुळे पिकाचे नुकसान 50 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन:-

भुंगा नियंत्रण:-

1.भुंगा नियंत्रनासाठी बांधावरील गरज नसलेली कडुलिंब, बाभूळ,यांसारखी झाडे व छोटी झुडपे काढून टाकावीत. 

2.शक्य असल्यास imidacloprid 17.8 SL 1.5ml/lit, किंवा इतर लेबल क्लेम असलेल्या कीटकनाशकांची फवारणी संध्याकाळच्या वेळी बांधावरच्या कडुलिंब व इतर झाडांवर करावी.ही फवारणी उन्हाळ्याच्या दिवसात दर 15 दिवसांत घ्यावी.

3.पहिल्या वळीव पावसानंतर एकरी ५-६ कामगंध सापळे शेतामध्ये लावावेत.

4.संध्याकाळी जमा होणारे भुंगे गोळा करून नष्ट करावे.

हुमणी नियंत्रण:-

1.उन्हाळ्यात शेत खोल नांगरून घ्यावे,त्यामुळे कोष,हुमणी यांसारख्या अवस्था बाहेर पडतात.पक्षांचे नैसर्गिकरित्या भक्ष्य बनतात.

2.चांगले कुजलेल्या शेणखतातुन मेटाराझीअम मित्रबुरशी टाकावी 

3.भुईमूग,मिरची यांसारख्या उशिरा किंवा लवकर पेरणी /लावण टाळावी.

 

-टीम IPM SCHOOL,

 7414970150

English Summary: Do also integrated pest management of humni Published on: 21 April 2022, 01:07 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters