1. कृषीपीडिया

प्रगत कृषि तंत्रज्ञान शेतकरी बांधवाना सहजतेने उपलब्ध व्हावे :- कृषि आयुक्त धीरजकुमार

राज्यांतर्गत कृषी विद्यापीठांनी कालसुसंगत शेती संशोधनाचे कार्य योग्यरित्या केले

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
प्रगत कृषि तंत्रज्ञान शेतकरी बांधवाना सहजतेने उपलब्ध व्हावे :- कृषि आयुक्त धीरजकुमार

प्रगत कृषि तंत्रज्ञान शेतकरी बांधवाना सहजतेने उपलब्ध व्हावे :- कृषि आयुक्त धीरजकुमार

राज्यांतर्गत कृषी विद्यापीठांनी कालसुसंगत शेती संशोधनाचे कार्य योग्यरित्या केले असून आता कृषि विभाग व इतर समांतर संस्थाचे सहयोगातून आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान गाव पातळीवर वेळेत पोहोचवीने ही आपली सामूहिक जबाबदारी मानत सर्वांनी कार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कृषि आयुक्त श्री. धीरजकुमार यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्यालयी कृषि महाविद्यालयाच्या स्व.

के.आर. ठाकरे सभागृहात आयोजित विभागीय कृषी संशोधन K.R. Departmental Agricultural Research conducted at Thackeray Auditorium व विस्तार सल्लागार समिती सभेच्या उद्घाटन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

भारतीय शेतकरी अधोगती च्या मार्गाने चालला कसा ते वाचा आणि विचार बदला

कृषी विद्यापीठाद्वारे प्रतिवर्षी प्रसारित होणाऱ्या शिफारसी व पीक वाणे कृषी विभागाचे सहयोगाने शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकाधिक प्रात्यक्षिकांचे माध्यमातून लोकप्रिय करता येतील असे सांगताना शेतकरी उत्पादक कंपनी, प्रयोगशील प्रगतिशील शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व सर्व साधारण शेतकरी यांच्यातील मध्यस्थ म्हणून आपली भूमिका पार

पाडावी अशी भावनिक साद देखील कृषि आयुक्त श्री.धीरजकुमार यांनी या निमित्ताने घातली. तर वातावरण बदलाच्या परिस्थितीत शेती व्यवसायाला पशुपालन व दुग्ध व्यवसायासारख्या भक्कम जोडीदाराची सक्षम साथ अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त श्री सचिन प्रताप सिंह यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. पारंपरिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय, दुग्ध पदार्थ निर्मिती, कोंबडी पालन, शेळीपालनाला व्यावसायिकतेची जोड देत शास्त्रीय पद्धतीने वंश सुधार, चारा लागवड व प्रक्रिया, गावापातळीवर

स्वच्छ दूध उत्पादन, दुग्ध प्रक्रिया व दुग्ध पदार्थ निर्मिती, पॅकेजिंग व विक्री तंत्रज्ञान, परस बागेसह व्यावसायिक कोंबडी पालन व शेळीपालन तंत्रज्ञान अवगत करीत त्याची अंमलबजावणी करावी असे आवाहन श्री. सचिन्द्र प्रताप सिहं यांनी आपल्या मार्गदर्शनात केले व लंम्पि सारख्या संसर्गजन्य रोगातून राज्य बाहेर आले असून पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी बांधवानी रात्रंदिवस सेवा देत आपली कर्तव्य निष्ठा जोपसल्याचे प्रतिपादित केले.सभेच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू

डॉ. शरद गडाख यांनी आपल्यातील संशोधक वृत्तीची चुणूक सभागृहाला दाखविली. विदर्भातील पूर्व, मध्य व पश्चिम विभागातील पीक पद्धतीतील मुख्य वैशिष्ट्ये, काळानुसार अपेक्षित बदल अतिशय विश्वासाने नमूद करत एक गाव- एक तंत्रज्ञान,एक गाव- एक वाण, यासह मॉडेल व्हिलेज संकल्पना व कृषक विज्ञान मंचाची गरज अधिक विस्तारितपणे सभागृहाला अवगत करत डॉ. गडाख यांनी उपस्थित सर्वाना प्रोत्साहित केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच्या साध्या सोप्या उपाय योजना

विस्तारित करताना डॉ.गडाख यांनी सर्व विभागांच्या एकात्मिक प्रयत्नांची गरज प्रतिपादित केली.याप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी सादरीकरणासह केलेल्या प्रस्ताविकात तेलबिया क्षेत्र वाढ़, फळबाग व्यवस्थापन, पेरीव भात पद्धत, पीक पद्धतीतील बदल, हळद, ओवा, जिरे सोपं क्षेत्र वाढ करण्यासह जोड धंद्याचं महत्व विषद केले. तर विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण तथा विभागप्रमुख कीटकशास्त्र विभाग डॉ. धनराज

उंदीरवाडे व अधिष्ठाता कृषी तथा विभाग प्रमुख वनस्पती रोग शास्त्र विभाग डॉ. शामसुंदर माने, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक श्री हरिहर कौसडीकर, , यांनी सुद्धा सभागृहाला समायोजित मार्गदर्शन केले. याप्रसंगी अधिष्ठाता उद्यानविड्या डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार, डॉ. विनोद नागदेवते, डॉ. डी टी देशमुख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 

English Summary: Advanced agricultural technology should be easily available to farmers :- Agriculture Commissioner Dheeraj Kumar Published on: 30 September 2022, 06:31 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters