1. कृषी व्यवसाय

शेतकऱ्यांनो माती परीक्षण प्रयोगशाळा व्यवसाय सुरू करा; कमवाल लाखों रुपये

सध्या शेतीमध्ये अनेक बदल होत आहेत. अनेक शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय करून चांगले पैसे कमवत असतात. शेतीव्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असला तरी त्यासोबत अनेक व्यवसाय ग्रामीण भागात केले जातात. पशुपालन देखील मोठ्या प्रमाणावर चालणार व्यवसाय आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना उपयोगी असणाऱ्या व्यवसायाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
soil testing lab businesses

soil testing lab businesses

सध्या शेतीमध्ये अनेक बदल होत आहेत. अनेक शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय करून चांगले पैसे कमवत असतात. शेतीव्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असला तरी त्यासोबत अनेक व्यवसाय ग्रामीण भागात केले जातात. पशुपालन देखील मोठ्या प्रमाणावर चालणार व्यवसाय आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना उपयोगी असणाऱ्या व्यवसायाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

आज आपण शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणाऱ्या व्यवसायाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. शेतीशी संबंधित आणि ग्रामीण भागात चांगले आर्थिक उत्पन्न देऊ शकतील असे व्यवसाय खालीलप्रमाणे...

ग्रामीण भागात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेषता शेती हा मोठ्या प्रमाणावर चालणारा व्यवसाय आहे. जर आपण शेती संबंधी विचार केला तर माती परीक्षण ही काळाची गरज आहे. चांगल्या उत्पादनासाठी बरेच शेतकरी माती परीक्षण करू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात याला जास्त मागणी असेल.

शूरवीर' म्हैसला तोडच नाही! वय 4 वर्षे, उंची 5.5 फूट आणि किंमत 15 कोटी, देशभरात प्रसिद्ध

त्यामुळे तरुण पिढी किंवा शेतकरी हा व्यवसाय (Business) उभा करून चांगले पैसे कमवू शकतात. माती प्रयोगशाळा अर्थात मृदा प्रयोगशाळा स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना खूप मोठी सोय होईल आणि व्यवसाय देखील चांगला चालेल. या व्यवसायासाठी तुम्हाला सरकारकडून देखील मदत होऊ शकते. अधिक माहितीसाठी तुम्ही कृषी विभागाशी संपर्क साधू शकता.

सरकारच्या ‘या’ निर्णयाने शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, किसान सभेने थेट कारण सांगितले..

महत्वाचे म्हणजे ग्रामीण भागात ज्या प्रमाणात शेती केली जाते त्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो. जनावरांपासून अधिक दूध उत्पादनासाठी आहार व्यवस्थापन गरजेचे असल्यामुळे अनेक प्रकारच्या पशुखाद्याचे आवश्यकता भासते. त्यामुळे ही गरज ओळखून तुम्ही ग्रामीण भागात पशुखाद्य उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला तर कमी गुंतवणुकीतून हा चांगला व्यवसाय होऊ शकतो.

मजुरांची कमतरता, यांत्रिकीकरणातील बिघाड
शेतकऱ्यांनो जनावरांमधील गंभीर आजार टाळण्यासाठी लसीकरणाची योग्य वेळ जाणून घ्या..
बैलगाडा जोडीने मैदान मारले! मालकाला थार गाडी जिंकून दिली

English Summary: Farmers start soil testing lab businesses; You will earn lakhs of rupees Published on: 11 April 2023, 03:11 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters